परंडा (प्रतिनिधी) - उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे  शनिवार दि.2 रोजी  पोषण सल्ला, तपासणी, निदान उपचार, संदर्भ सेवा, 18+ आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करुन कार्ड काढण्यात आले. तसेच आयुष्यमान कार्ड देखील काढण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.गणराज चौघुले व डॉ.आनंद मोरे यांनी शिबीरात सर्व रुग्णांना आयुष्यमान भव कार्यक्रम अंतर्गत माता बाल आरोग्य, लसीकरण, पोषण सल्ला, इत्यादी तपासणी, निदान उपचार, संदर्भ सेवा,आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तानाजी गुंजाळ यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमाविषयी माहिती दिली.सदरील कार्यक्रमात माता आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, तोंडाची तपासणी या विषयावर डॉ.दिपक पेठे यांनी मार्गदर्शन केले.

सदरील कार्यक्रमात तज्ज्ञ डॉ.अंकुश पवार, विक्रम वाघ औषधनिर्माण अधिकारी अंजनी मते, अधिपरिसेविका , रुपाली सौताडेकर, नागेश रनखांब, जगदाळे ज्योती, थिटे आऊबाई तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.  डॉ.अभिजीत खरटमल यांनी उपस्थित सर्व रुग्णांचे आभार मानून मार्गदर्शन केले.तानाजी गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले.या शिबिरात अवयवदान फार्म भरून घेण्यात आले.


 
Top