तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे  चंपाषष्ठी निमित्त सोमवार दि.18 डिसेंबर रोजी काटकर अशोकराव कदम यांची मानाची खंडोबाची काटी मिरवणूक शहरातुन काढण्यात आली. काटकर अशोक कदम यांच्या शुक्रवार पेठ येथील घरापासुन खंडोबा काठीची मिरवणूक काढण्यात आली. यात आकर्षक अशी खंडोबा काठी सजविण्यात आली होती. 

यात अग्रभागी खंडोबा भक्त हातात चाबुक घेवुन हातावर चाबकाचे वार घेत भंडारा उधळत हलगीच्या कडकडाटात नाचत  सहभागी झाले होत. या काठीचे शहरात जागोजागी पुजन करुन नागरिक  दर्शन  घेत होते. सांळुके गल्ली, आर्य चौक, कमान वेस, आंबेडकर चौक, भवानी रोड येथुन तुळजाभवानी मंदिर महाध्दार समोर आली. ती काठी महाध्दार समोर मिरवण्यात आल्यानंतर परत अशोक काटकर यांच्या घरी नेण्यायात आली. यावेळी काटीचे मानकरी अशोकराव कदम काटकर यांच्या सोबत वारुवाले आप्पा कदम, सुरज चोपदार, धनु काटकर, नागू ननवरे, सूनी काळे, महादू शिंदे, नवनाथ घाटगे, विठ्ठल शिरसगर, आदित्य कदम, धनु खंडागळे हे उपस्थित होते.


 
Top