भूम (प्रतिनिधी)-भूम-वाशी रोड वरील श्री गजानन महाराज मंदिरातील सभागृहाच्या स्लॅब भरण्याचा बांधकामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला. 

येथील गजानन महाराज व्यापारी मंडळ यांना श्री गजानन महाराज मंदिराचा सभागृह बांधण्याचे आश्वासन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी दिले होते. राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या सहकार्यातून माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या प्रयत्नातून विशेष वैशिष्टपुर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामाचा स्लॅप भरण्याचा शुभारंभ माजी .नगराध्यक्ष  संजय गाढवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष संयोगिताताई गाढवे, दिलीप गाढवे, दीपक खराडे, बालाजी माळी, अंबादास वरवडे, अरविंद शिंदे, अण्णा साठे, रंणजीत साळुंके, सुनील बागडे, अशोक गाढवे, सतीश मोरे, राम मुंडेकर,आदी  उपस्थित होते.


 
Top