धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या  केशेगाव जि.प.गटातील केशेगाव गणप्रमुखपदी सय्यद दस्तगीर पटेल यांची  नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष महेंद्र कधुरगुडे यांच्या हस्ते व धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे दि.18 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातील  केशेगाव गणप्रमुखपदी सय्यद पटेल  नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गाव पातळीवर संघटनात्मक बांधणी करून आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट करू असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पदाधिकारी यांच्या निवडीनंतर जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते समियोड्डीन मशायक, सामाजिक न्याय विभाग  जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सेवा दल विभाग जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे, अंबेजवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, मनोज साळुंखे आदीसह पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.


 
Top