धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापूर ते उंडरगाव या मार्गावरील तडवळा, छत्रपती शिवाजी नगर काक्रंबा, काक्रंबा गाव, वडगाव, खंडाळा, ताकविकी, तोरंबा, उंडरगाव, कार्ला गावांसाठी महाराष्ट्र शासनाची बस सेवा नियमित व सुरळीत चालू नसल्यामुळे शाळा व कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थी, वृद्ध नागरिक, महिला, रुग्ण यांची गैरसोय होत असून ही बस सेवा सुरळीत चालू होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धाराशिव यांना प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर नियमित व दर तासाला सुरळीत एसटीची सेवा सुरू करण्यासाठी पत्र दिले. या मार्गावरील गावांतील लोकसंख्या 30,000 आहे. ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी केशेगाव जि.प चे गट प्रमुख लिंबराज लोखंडे, सोहेल तांबोळी यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष यांच्याद्वारे विभाग नियंत्रक यांना मागणी करण्यात आली.
