धाराशिव (प्रतिनिधी)-येथील स्वाती राम शिंदे यांनी डॉ. स्मिता विरेंद्र गवळी, डॉ. विरेंद्र गवळी यांच्याकडून उपचार करून घेताना त्यांनी व्यवस्थित उपचार न केल्याने स्वाती शिंदे यांचे गर्भाशय काढून टाकावे लागले. याबद्दल ग्राहक आयोग धाराशिव यांनी संबंधित डॉक्टरांना जबाबदार धरून त्यांना 75 हजार रूपये दंड आणि 40 हजार रूपये मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 10 हजार रूपये देणेबाबत आदेश दिला आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की, स्वाती राम शिंदे यांची सिझिरियन शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला. ही बाबत निदर्शनास आल्यास डॉक्टर दाम्पत्यांनी त्यावर इलाज केला नाही म्हणून स्वामी राम शिंदे यांनी ॲड. अविनाश मैंदरकर आणि ॲड. देविदास वडगावकर यांच्या मार्फत धाराशिव येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची सुनावणी आयोगाचे अध्यक्ष के. डी. वडणे आणि सदस्य मुकूंद सस्ते यांच्या समोर झाली. सुनावणी नंतर आयोगाने हा निकाल दिला. या निकालाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
