धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील पोलीस ग्राउंड वर चालू असलेल्या 22 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेत पहिल्या दिवशी रिकर्व्ह राउंड प्रकारात वैयक्तिक मुला मधून सोलापूरच्या पृथ्वीराज घाडगे याने 664 गुण, मुलींमधून नाशिकच्या वैष्णवी कुलकर्णीने 652 गुण तर मिक्स इव्हेंट मध्ये साताराच्या ह्रितिक पवार आणि ज्ञानेश्वरी देसाई यांनी प्रथम सेट जिंकत सुवर्ण पदक पटकावत स्पर्धेवर वर्चस्व प्रस्तापीत केले.
महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने धाराशिव येथील पोलीस ग्राउंडवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी रिकर्व्ह राउंड प्रकारचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष रंगराव साळुंके, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, प्रा. भैरवनाथ खांडेकर, आंतरराष्ट्रीय कोच अभिजित दळवी, प्रवीण सावंत, उद्योजक गोविंद मराठे, गौरव बागल, सुदर्शन शिंदे, अण्णासाहेब पाटील, कोच कैलास लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर, कॉम्पिटेशन डायरेक्टर गणेश गिरमकर आदींची प्रमुख उपस्तीथी होती.
रिकर्व्ह राउंडचा अंतिम निकाल अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय प्रमाणे, मुलामध्ये ओव्हरऑल व वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये पृथ्वीराज घाडगे (सोलापूर), ज्ञानेश चेरले (नांदेड), आदित्य पवार (सोलापूर) मुलींमध्ये ओव्हरऑल मध्ये वैष्णवी कुलकर्णी (नाशिक), सायली माने (सोलापूर), गारगी चव्हाण (अहमदनगर) वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये वैष्णवी कुलकर्णी (नाशिक), वंशी काडवानी (पुणे), सायली माने (सोलापूर), मिक्स एलिमिनेशन मध्ये ह्रितिक पवार व ज्ञानेश्वरी देसाई (सातारा) सार्थक शेळके व सानिका मरडे (जालना), पृथ्वीराज घाडगे व सायली माने (सोलापूर) तर सांघिक प्रकारात मुलामध्ये सोलापूर, पुणे, सातारा तर मुलींमध्ये अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. 26 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेतील धनुर्धरांचा थरार धाराशिवकर अनुभवत आहेत.