धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयात इ.7वी च्या इमारतीतील 19 क्र. वर्गखोलीत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संस्थाध्यक्ष सुधीर पाटील व सरचिटणीस सप्रेमाताई पाटील प्रशासकिय अधिकारी आदित्य पाटील यांच्या संकल्पेनेतून प्रशालेतील अप्रगत विद्यार्थी प्रगत झाले पाहिजे या करिता अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबविण्याकरिता पालक मेळावा आयोजित केला होता.
या पालक मेळावयास प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एस. देशमुख, उपमुख्याध्यापक एस.बी. कोळी पर्यवेक्षक आर.बी. जाधव यांनी मार्गदर्शन करुन पालकांच्या पाल्या बाबत शंकेचे निरसण करुन घेतले . अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका घेऊन त्यांना प्रगतशील शिक्षीत होतील याची घ्यावी देण्यात आली. या मेळाव्यास 100 हून अधिक पालक व संबधित शिक्षकवृंद उपस्थित होते सुत्रसंचालन व आभार कलाध्यापक एस.डी. वाघ यांनी केले.