धाराशिव (प्रतिनिधी) शिक्षण महर्षि  सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या 2024 वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन आज शनिवारी दि.30 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा आर्ट ऑफ लिविंगचे धाराशिव  प्रमुख नितीन भोसले  यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शहरातील पोलिस लाईन समोरील संस्थेच्या  कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नितीन भोसले यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, सहकार बोर्ड अधिकारी मधुकर जाधव, संचालक प्रा. जयप्रकाश कोळगे, पत्रकार सुभाष कदम, डॉ. वसंत मुंडे, महादेव सुर्यवंशी, आबा सरकाळे, अजिंक्य जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष रामदास कोळगे यांनी मान्यवरांचा  शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी व्यवस्थापक शाम गंगावणे, कर्मचारी वैशाली जोशी, आवेज शेख, शेखर सराफ, श्रीकांत काशिद, शाम शेरखाने, श्रीकांत पाटील  यांची उपस्थिती होती.


 
Top