परंडा (प्रतिनिधी) -महाराष्ट्राचे लोकनेते, संघर्षयाञी, कुशल संघटक, जनसामान्यांच्या सर्वागीण प्रगतीसाठी आपले आयुष्य वेचणारे, सर्वांचे प्रेरणास्थान स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त युवा नेते मा.समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  अरविंद रगडे, शहराध्यक्ष ॲड. संदीप शेळके, ॲड. तानाजी वाघमारे, सुजित परदेशी, रामकृष्ण घोडके, अविनाश विधाते, सुरज काळे, बाळासाहेब गोडगे, अरुण करळे, राजाभाऊ पाटील, उत्तम शिंदे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top