धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शहर संघटक प्रशांत साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त दि.14 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरेनगर येथे प्रभाग 4 मधील महिला, मुली, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता महिला व मुलींसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेकअप आर्टिस्ट सूर्या-नेत्रा यांचे मेकअप व हेअरस्टाईल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त महिला व मुलींनी सहभागी घ्यावा. तसेच प्रभाग 4 मधील नागरिकांसाठी आभा कार्ड व आयुष्मान कार्ड काढणे, आधारकार्ड काढणे व आधार दुरूस्ती त्याचबरोबर रक्तदान शिबिर, श्री स्वामी समर्थ मंदिर येथे महाआरती व अन्नदान आणि प्रभाग 4 मधील विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर वाढदिवसाचा भव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रभाग 4 मधील नागरिकांनी उपस्थित राहावे असेही संयोजकांनी कळविले आहे.
%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87.jpeg)