धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, कर्नाटक,तेलंगणा सह इतर राज्यातील लाखो लोकांचे कुलदैवत असलेल्या अणदूर ता. तुळजापूर येथील  श्री खंडेबाची यात्रा बुधवारी दि.13 डिसेंबर सुरू होत असून, या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात्रा निमित्ताने लाखो रुपये बक्षिस असलेल्या भव्य कुस्ती स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. 

श्री खंडोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन खालील प्रमाणे करण्यात आले आहे.  बुधवार दि 13 डिसेंबर 23 रोजी पहाटे 4 वाजता काकडा आरती. त्यानंतर धार्मिक विधी व  भक्त दर्शनास सुरुवात. सकाळी 9 वाजता श्री ची महापूजा. बुधवार दिवसभर नैवेद्य दाखवणे,लंगर तोडणे, तळी उचलणे इत्यादी धार्मिक विधी. रात्री 10 वाजता श्रीची पूजा व अश्वारूढ छबीन्याची मंदिरामध्ये सवाद्य मिरवणूक.  रात्री 12 वाजता नळदुर्गचे मानकरी यांचे सवाद्य मंदिरात आगमन. मंदिर समिती व यात्रा कमिटी तर्फे स्वागत व चहापानाचा कार्यक्रम. रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी मानकर यांचा मानपान सोहळा करार प्रदान सोहळा व श्रीची महाआरती. नंतर श्रीची मुख्य मूर्ती व इतर मुर्त्या पालखीसह अणदूर वरून श्रीक्षेत्र मैलारपूर नळदुर्गला पालखी सह प्रस्थान. गुरुवार पहाटे 5 वाजता श्रीक्षेत्र मैलारपूर मंदिरात श्री खंडेरायाची प्रतिष्ठापना धार्मिक विधी व महाप्रसादाचे वाटप. गुरुवारी दुपारी 2 वाजता जवाहर महाविद्यालयाच्या मैदानावर जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.


 
Top