तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे पुरातन व मौल्यवान सोने-चांदीचे अलंकार गहाळ प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार यांना दिले आहेत. या प्रकरणी कुणा विरोधात कधी गुन्हे दाखल होणार याची उत्सुकता भाविकांमध्ये निर्माण झाली आहे. महंत, सेवेकरी व प्रशासकीय अधिकारी यात दोषी सापडले आहेत. चांदीचा मुकुट, त्रिशूल, प्रभावळ, धुपारती यासह अनेक चांदीच्या व सोन्याच्या वस्तू गायब आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्याची मोजतात झाली नव्हती, ती मोजतात जिल्हाधिकारी यांनी करण्याचे आदेश दिले व त्यानंतर त्या मोजदादीमध्ये अनेक मौल्यवान अलंकार सोने-चांदीच्या वस्तू गहाळ असल्याचं समोर आले आहे. या गहाळ वस्तूची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत.
अलंकाराची मोजदाद झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी कार्यवाही करण्यासाठी कायदेशीर समिती नेमली होती त्या समितीने दिलेला अहवालात तुळजाभवानी देवीचे अनेक पुरातन अलंकार सोन्या-चांदीचे दागिने हे गहाळ झाल्याचं समोर आलं आहे. त्यात हे दागिने व अलंकार ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित करून हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने महंत सेवेकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होणार आहेत.
खंडपीठा मार्फत याची चौकशी करा- गंगणे
श्री तुळजाभवानीच्या गायब दागिन्यांची खंडपीठामार्फत चौकशी करावी,अशी मागणी श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष किशोर गंगणे नी केली आहे.
जबाबदारी निश्चित करुन गुन्हे दाखल केले जाणार -जिल्हाधिकारी
श्रीतुळजाभवानी मातेस भाविकांनी अर्पण केलेले सोनेचांदीदागदागिने व इतर वस्तू याची दोन ते तीन महिन्या पुर्वी नेमलेल्या समिती सदस्य समोर मोजदाद झाली आहे. या मोजदाद मध्ये काही वस्तू जुन्या रेकाँर्डवर असणाऱ्या पण आजच्या घडीला उपलब्ध नाहीत या गहाळ झालेल्या वस्तु ज्याचा ताब्यात आहेत त्याच्यावर ही जबाबदारी निश्चित करुन गुन्हे नोंदवण्यात येणार असल्याची माहिती श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डाँ सचिन ओम्बासे नी दिली.
