तुळजापूर,(प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूरचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांची नुकतीच इचलकरंजी येथे बदली झाली असून त्यांच्या जागी तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे प्रभारी प्राचार्य म्हणून मेजर प्रोफेसर डॉ. यशवंतराव डोके यांची नियूक्ती करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 1987 रोजी महाविद्यालयात इंग्रजी विभागाचे प्राध्यापक म्हणून डॉ. डोके रुजू झाले. 

बी. ए. व एम. ए. इंग्रजी विषयातील शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून “कमवा व शिका“ या योजनेचा लाभ घेऊन प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले. 2008 मध्ये “द थिम्स ऑफ जेंडर ॲड क्लास इन द फिक्शन ऑफ सुनिता जोशी“ या विषयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पी. एच. डी. पदवी संपन्न केली. 2014 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली व आजपर्यंत पाच संशोधकांना पी. एच. डी. अवार्ड झाली. त्यांनी “जे. के. रॉऊलींगस हॅरी पॉटर: अ क्वेस्ट फॉर ह्यूमन व्हॅलूज“ या विषयावर मायनर रिसर्च प्रोजेक्ट युजीसी कडे सादर केला. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर जर्नलमधून एकूण 32 शोध निबंध तसेच दोन पुस्तकांचे प्रकाशन केले. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय 43 सेमिनार मध्ये सहभाग नोंदविला. 1986 ते 89 मध्ये महाविद्यालयात एन. सी. सी. विभागाचे काळजी वाहू म्हणून काम पाहिले. 1990 मध्ये कामटी जिल्हा नागपूर येथून प्री-कमिशन घेऊन सेंकड लेफ्टनंट पदापासून मेजर पदापर्यंत मजल घेतली. डॉ. डोके यांनी ऑफिसर म्हणून 1988 ते 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत 33 वर्षे एन. सी. सी. ऑफिसर म्हणून कामकाज पाहिले , तसेच 2006 पासून  आजपर्यंत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत व सप्टेंबर 2022 मध्ये नॅक बेंगलोर कडून महाविद्यालयास 'ए' ग्रेड मिळाला. या त्यांच्या यशामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर चे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सन्माननीय प्राचार्य सौ. शुभांगी ताई मुरलीधर गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जे. एस. देशमुख, डीएसके कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय, इचलकरंजीचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर व महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते यां सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. डोके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 
Top