तुळजापूर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रिमियर लीग तुळजापूर - 2023 पर्व पहिले  11डिसेंबर ते 15डिसेंबर 2023या कालावधीत हाडको मैदान येथे आयोजित करण्यात आल्याची माहीती आयोजक कृषीउत्पन्नबाजारसमिती माजी सभापती तथा संचाल क विजय गंगणे यांनी दिली.

धाराशिव लोकसभा मतदार संघ निमंत्रीत नाईट सामने होणार असुन स्पर्धतील प्रथम विजेत्या संघास प्रथम पारितोषिक दीड लाख रुपये, युवा नेते विनोद गंगणे द्वितीय पारितोषिक एक लाख, कृषीउत्पन्नबाजारसमिती सभापती  सचिन पाटील तर्फ तृतीय पारितोषिक पन्नास हजार रुपये. नगराध्यक्ष सचिन रोचकरी तर्फ चतुर्थ पारितोषिक पन्नास हजार रुपये शशी ज्योत तर्फ दिले जाणार आहे. यात लोकसभा मतदार संघातील सोळा संघ भाग घेणार आहेत.या स्पर्धेतील 

मॅन ऑफ द सिरिज -एल ई डी स्क्रिन, बेस्ट बॉलर, बँटसमन, फील्डर बेस्ट, संघमालक - सायकल बेस्ट टीम जँकेट भेट देण्यात येणार आहेत. या स्पर्धचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती  विजयकुमार गंगणे मित्र परिवार यांनी केले आहे.


 
Top