भूम (प्रतिनिधी)-शिक्षण व रोजगारांमध्ये संधीची कमतरता झाल्यानेच आरक्षणाची गरज वाढल्याचे मत जेष्ठ अर्थतज्ञ तथा अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी आज व्यक्त केले. भूम येथे अलंप्रभु आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाची सांगता समारंभात ते बोलत होते. विश्वगुरू भारत मृगजळ की शक्यता या विषयावरती त्यांची प्राध्यापक कल्याण साठे यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोकील बोलत होते.
अलंमपभु व्याख्यान मालेचे हे बारावे वर्ष आहे. विश्वगुरू भारत मृगजळ की शक्यता या विषयावर अर्थ तज्ञ अनिल बोकील यांची प्राध्यापक कल्याण साठे यांनी प्रकट मुलाखत यावेळी घेतली. यावेळी बोकील यांनी भारत देशाची आर्थिक स्थिती जगाच्या तुलनेत कशी आहे याचे सविस्तर विवचन केले. शिक्षण व रोजगारांमध्ये संधीची कमतरता असल्यानेच आरक्षणाची गरज निर्माण झाली असल्याचे मत त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. यावेळी बोकील यांनी सर्वसामान्यांना माहित नसणारे देशाचे आर्थिक बाबी विषयीचे पैलू उघडून सांगितले. या व्याख्यानमालेतील प्रकट मुलाखतीत अर्थतज्ञ बोकील यांनी खऱ्या अर्थशास्त्र सर्वसामान्य माणसाला अद्याप पर्यंत कळले नसते ते सांगून साठ वर्षावरील सर्व वयोवृद्ध माणसांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करून त्यांना दहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करीत असल्याचे सांगितले. यावेळी बोकील यांनी अर्थशास्त्र, अर्थ नीती, मराठा आरक्षण आदी प्रश्नांना आपल्या शैलीतून उपस्थित त्यांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तात्याबा कांबळे यांनी तर आभार कॅप्टन विजय मनसुके यांनी व्यक्त केले.