परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील नेटके फार्महाऊस भोंजा हवेली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा येथील शालेय शिक्षक व विद्यार्थी यांनी बायोगॅस निर्मिती संयंत्रास भेट दिली. 

या वेळी शालेय शिक्षण समिती चे उपाध्यक्ष शेतकरी अमोल नेटके यांनी आपल्या पशु जनावरांच्या शेणापासून गॅस उपलब्ध होत असुन या बायोगॅसमुळे चांगला वापर होत आहे.तसेच यावेळी शालेय विज्ञान शिक्षक सोमनाथ पवार यांनी विद्यार्थ्यांना माहिती देताना यामध्ये ऑक्सीजन शिवाय अपघटन होऊन मिथेन व कार्बन डायऑकसाइड वायू तयार होतो मिथेन हा वायू ज्वलनशील आहे याचा वापर इंधन म्हणून केला जातो तसेच विद्युत रक्षक तडीत यंत्र व सोलर ऊर्जा यंत्राची ही माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक कवी बाबासाहेब घोगरे सोबत विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात नेटके फार्महाऊस येथे प्रत्यक्ष पाहणी करून माहिती व वनभोजनाचा आनंद घेतला.


 
Top