तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे कालभैरव जयंती निमित्ताने मंगळवार दि. 5 डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर ही भुमी देव भुमी आहे. या जाज्वल्य क्षेत्री, नवदुर्गा, श्री खंडोबा, श्री नृसिंह, श्रीदत्त या परिवार देवता तसेच पुरातन काळी 64 भैरव, 64 योगीनी अशी देवताची स्थान होती. आज घडीला तुळजापूर क्षेत्री 8 भैरवांचे स्थान आढळुन येतात.


 
Top