तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील विद्युत पुरवठा करण्यासाठी शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्याकडेला वळणावर व लोकांच्याघरांसमोर महावितरणचे मिनी डिपी, इलेक्ट्रिकल सर्किट बॉक्स बसवण्यातआले आहेत. मात्र, बहुतांश डीपी हे उघडे असून त्याला कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नाही.
उघड्या डीपीमुळे दुर्दैवी घटना घडण्याची मोठी शक्यता आहे. शहरात विद्युत पुरवठा महावितरणकडून ठिकठिकाणी करण्यासाठी जागोजागी डीपी व मिनी डीपी बसवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणच्या डीपी या उघड्या स्वरूपात असून, त्यातील मोठ्या वायरी स्पष्ट दिसतात. अनेक ठिकाणी वायरी बाहेर आल्या आहेत. चालता चालता सहज हात लागून धोका ओढवण्याची शक्यताही अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. डीपीचा धोका होऊ नये, म्हणून सातत्याने काळजी घेतल्याचे दिसून येत नाही. शहरातील प्रत्येक रस्त्यावर असे डीपी असून, लोकवस्ती असलेल्या भागातही उघडे डीपी दिसून येत आहेत.
ङी तुळजाभवानी मंदिर, भवानी रोड, महाध्दार रोड, शुक्रवार पेठ, पाण्याची टाकी या मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर या मिनी डीपी आहेत. या डीपी जवळुन भाविक ये-जा करीत असतात. तसेच फुटपाथच्या बाजूला असलेले हे डीपी उघड्या स्थितीत आहेत. जीवघेण्या डीपीमुळे दुर्घटना घडण्याची महावितरण वाट पाहत आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त केला जात आहे. या डीपी नगर पालिकेची आहे की महावितरणची हे महत्त्वाचे नाही. निष्पाप लोकांचा जीव गेला तर जबाबदार कोण, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. डीपीमुळे यापूर्वी अनेक किरकोळ दुर्घटना घडल्या आहेत. तात्पुरती काळजी घेतली जाते, नंतर मात्र पुन्हा पहिले पाढे पंचावनप्रमाणे सुरू राहते.शहरातील रोडवर रस्त्याच्या कडेला डीपी बसवण्यात आला आहे. डीपीच्या शेजारीच लोकांची घरे आहेत.याच फुटपाथवरून ये-जा करीत असतात. रस्ते चौकदरम्यानही ठिकठिकाणी डीपी आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यांवर, नगरांमध्ये, झोपडपट्टी भागात उघडे डीपी असून, या डीपी सापळ्याप्रमाणे धोकादायक स्थितीत दिसून येत आहेत.