धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाचा खासदार तसेच गांधी परिवारांचे निकटवर्तीय असणारे धीरज साहूच्या घरावर टाकलेल्या धाडीत जवळपास 310 करोडची पेक्षा जास्त बेनामी संपत्ती आढळून आली. या खासदराकडे इतकी बेनामी संपत्ती कुठून आली याचा शोध लावला पाहिजे. एक वर्षापुवी सदर ज्या खाजदाराने नोट बंदी व काळा पैसा संदर्भात मुक्ताफळे उधळली होती त्यांच्याच घरात इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी काळा पैसा सापडावा यावरुन खासदाराची व काँग्रसची प्रवृत्ती लक्षात येते. परंतु देशाच्या तिजोरीचा रक्षक पतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रुपाने सक्षम पणे कार्यरत असुन “न खाऊगा न खाने दूगां” या धरतीवर भ्रष्टाचार व काळे धन संपवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रस पक्षाच्या खासदाराकडे सापडत असलेला काळ्या पैश्याचा व काँग्रस पक्षाच्या खासदाराचा निषेध नोंदवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष अंजली ताई बेताळे, वृषालीताई वरुडकर, अल्का गौरकर, दमयंती वाकुरे, सिंदु ताई सुरवसे, अल्काताई मगर, अल्काताई पवार, ॲड कल्पना ताई निपानीकर, पुजाताई देडे, शषीकला पाटील, सारीका कांबळे, चिगुताई जाधव आदीचा या आंदोलनात सहभाग होता.
