तुळजापूर (प्रतिनिधी)- भाजपा युवा मोर्चा तुळजापूरचे शहराध्यक्ष राजेश्वर कदम यांच्या भगिनी सौ.नीना कदम-माने यांनी पीएचडी पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून इंग्रजी विषयामध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. धाराशिव शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी उच्चशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होत आहेत, याचे अत्यंत समाधान वाटते असे यावेळी ते म्हणाले.


 
Top