तुळजापूर (प्रतिनिधी)- कारखानदारांची ऊसदरासाठी सुरू झालेली स्पर्धा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. गतवर्षी उसाचा पहिला हप्ता 2000  रुपयांपर्यंत मिळाला होता. यंदा त्यामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे रुपयाची वाढ होत आहे. तुळजापूर तालुक्यात ऐक सहकारी साखर कारखाना व तीन खाजगी कारखाने आहेत. सध्या या सर्व कारखान्यांन मध्ये ऊस दर देण्यासाठी स्पर्धा लागली आहे. शेतकरी ही जो जादा दर देणार त्यालाच ऊस घालणार असे म्हणत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कोल्हापूर भागात वाढीव ऊस दरासाठी यंदा रस्त्यावरची लढाई लढत ऊस उत्पादकांना गववर्षीच्या हंगामातील 100 रूपये अधिकचे मिळवून दिले. कोल्हापूरच्या तुलनेत धाराशिव जिल्हयात स्वाभीमानी शेतकरी संघटनाने आंदोलन केले. मात्र कारखानदारांकडून सुरू असलेल्या ऊस दराच्या स्पर्धेत शेतकऱ्यांना यंदा 2600 रूपयांपर्यंत पहिला हप्ता मिळत आहे. साखर, उपपदार्थ यांच्या दरात झालेली वाढ तसेच उसाची कमतरता, एकरी उत्पादनात झालेली घट यामुळे उसाला यंदा चांगला दर मिळत आहे. साखर विक्री सध्या 37 ते 38 रूपयांपर्यंत

होत आहे, गेल्या काही आठवड्यांपासून हा दर टिकून आहे. तुळजापूर तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात होतो यंदा माञ अत्यल्प पर्जन्यवृष्टी मुळे ऊसाचीः वाढ खुंटली परिणामी ऊस कमी झाला. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळावा, उसदारांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविद्र इंगळे सातत्याने आवाज उठवत असतात. मांजरा परिवाराने घेतलेल्या येथील कंचेश्वर साखर कारखान्याने 2550 रुपये रूपये पहिली उचल जाहीर केली आहे. तरीही त्यांनी मांजरा प्रमाणे दर देण्याचे त्यांचे नियोजन आहे. तर मनोरमा रुपामाता नँशनल शुगरने प्रतिक्विंटल 2700 रुपये दर जाहीर केला आहे. श्रीतुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग प्रथमता 2550 रुपये दर जाहीर केला होता. माञ ते 2800 रुपये दर देणार असल्याचे वृत्त आहे. उर्वरीत खाजगी छोटे कारखाने ही या दर स्पर्धेत उतरल्याने प्रथमच ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळणार आहे. सध्या सर्व कारखान्यांनी ऊस खेचयचा कार्यक्रम हाती घेतला आहे. हप्ता देत  तालुक्यात ऊस दारामध्ये स्पर्धा निर्माण केल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश साखर कारखाने अंतिम बिल हे प्रतिटन वाढ देणार कि नाही हे पाहवे लागणार आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इंधन, खते तसेच वाढलेली मजुरी यामुळे शेती अडचणीत येत असताना यंदा ऊस उत्पादकांना वाढीव दरामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. यंदाअत्यल्प पाऊस झाल्याने  उन्हाळा जाचक ठरणार आहे. पुढच्या वर्षी उसाचे क्षेत्र हे घटणार आहे. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा प्रयत्न सर्वच साखर कारखान्यांकडून सुरू आहे. दरवर्षीपेक्षा यंदा ऊस तोडणी यंत्रणा कमी आलेली असल्यामुळे या बाबतीतही कारखानदारांना कसरत

करावी लागत आहे.   

साखर दर वाढल्यामुळे ऊसाला 3500 रुपये दर द्यावा-जिल्हाध्यक्ष इंगळे  

स्वाभीमानी शेतकरी संघटनेने ऊसाला भाव मिळावा म्हणून सातत्याने आंदोलन करीत असुन यंदा साखरेचे दर वाढल्यामुळे ऊसाला 3500 रुपये दरद्यावा अशी मागणी केली आहे.


 
Top