भूम (प्रतिनिधी)-8 तासाची ड्युटी देवुन कायम सेवेत समावेश करावा यासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना भूम यांच्या वतीन खाते बाह्या पोस्टाच्या कर्मचारी यांनी गेल्या तीन दिवसापासून संप सुरु केल्याने पोस्ट कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे
नौकरी भरती करण्यासाठी 3 कायदा हटविण्यात यावा, सध्या खाते बाह्य कर्मचारी यांच्याकडून चार तासाची सेवा असताना पोस्टाकडून 8 तासाची सेवा करुन घेतली जाते असे असेल तर 8 तासाची सेवा देवुन कर्मचारी यांना कायम करा, कर्मचारी यांना वैद्यकिय सेवा व पेन्शन द्या आदी मागण्यासाठी तीन दिवसापासून संप सुरु आहे. या मागण्याचा केंद्र सरकारने विचार करुन आम्हा कर्मचारी यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना भूम यांनी केली आहे. या संपात संघटना जिल्हा अध्यक्ष संतोष सपकाळ, सचिव मेहमुद खॉ पठाण यांच्यासह कर्मचारी अनिल इजगज, प्रभाकर अघोर, श्रावण कांबळे, राजाभाउ देशमुख, अर्जून सितापे सुखदेव, जिकरे आदी सहभागी झाले आहेत.
