तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील चिचोली येथे कट मारण्याच्या कारणावरुन खुन करणाऱ्या मुख्य आरोपीस 10 वर्षे सक्त मजुरी व 10 हजार रूपये दंड व सहकारी आरोपीस यास सहा महिने कारावासाची शिक्षा जिल्हा सञ न्यायाधीश यांनी ठोठावली. 

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक. 22.11.2020 साडेसहा वाजता फिर्यादी पत्नी सुनिताचे पती यशवंत मल्लु चिमणे हे त्याचा मोठा भाउ दिलीप चिमणे यांना भेटुन रोडवरून घरी येत असताना सुधाकर शिवाप्पा वाघमारे याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्रमांक एम.एच.25 एस.6731 चा यशवंत चिमणे याचे हाताला कट मारल्याने यशवंत चिमणे याने सुधाकर वाघमारे यास तु माझे हाताला कट का मारला असे म्हणुन बोलत असताना सुधाकर वाघमारे हे शिवीगाळ करीत असताना त्याचा मुलगा अमोल सुधाकर वाघमारे याने यशवंत चिमणे यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील काठीने यशवंत चिमणे याचे डोकीत पाठीमागील बाजुस मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. बाबतची तक्रार दिली. त्याअनुषंगाने पो.स्टे. नळदुर्ग येथे गु.र.नं. 341/2020 दि.23.11.2020 रोजी गुन्हा नोंद होवुन आरोपींच्या विरूध्द तपास अधिकारी नळदुर्ग पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहा. पोलीस निरिक्षक सुधाकर बी. मोटे, यांनी तपास करून आरोपीच्या विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर दोषारोप पत्रावरून आरोपींच्या विरूध्द गुन्हा सिध्दीसाठी फिर्यादीच्या वतीने एकुण 9 साक्षीदार तपासण्यात आले.

सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-3 उस्मानाबाद व्ही.जे. मोहिते यांचे समोर झाली. न्यायालयासमोर आलेला साक्षीपुरावा व अति. जिल्हा शासकीय अभियोक्ता जयंत व्ही. देशमुख, यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश -3 उस्मानाबाद व्ही. जे. मोहिते  यांनी आरोपी अमोल सुधाकर वाघमारे यास भा.द.वि कलम 304(1) प्रमाणे दोषी ग्राहय धरले व त्यास 10 वर्ष सक्त मजुरी व 10 हजार रूपये द्रव्यदंड व आरोपी क्र. 2 सुधाकर वाघमारे यास भा.द.वि. कलम 323, 504 प्रमाणे दोषी ग्राहय धरले व त्यास 6 महिने कैद अशी शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अति. जिल्हा शासकीय अभियोक्ता यांना पो.उप.नि. राजेश एस. म्हेत्रे कोर्ट पैरवी नळदुर्ग पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले. अभियोग पक्षाच्या वतीने अति. जिल्हा शासकीय अभियोक्ता जयंत वामनराव देशमुख यांनी बाजू मांडली.


 
Top