कळंब (प्रतिनिधी ) येथे व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुक्याच्या वतीने या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन यात नविन पदाधिकारी यांना नियुक्ता देखील देण्यात आल्या. या बाबत सविस्तर वृत्त असे की दि.25 डिसें रोजी एम.डी.लाईव्ह कळंब येथे दुपारी 1 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या बैठकीत विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली तसेच नवीन पदअधिकारी यांच्या नियुक्ता देखील करण्यात आल्या.
या आयोजित केलेल्या आढावा बैठकीत व्हाईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र पालकमंत्री अमरजी चोंदे, व धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, अध्यक्ष कळंब तालुका रणजित गवळी, यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पद अधिकारी यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली या मध्ये श्रीकांत मडके यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, शिवप्रसाद बियाणी कळंब तालुका व्हॉइस ऑफ मीडिया उपाध्यक्षपदी तर अविनाश सावंत यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. या बैठकीत या आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस व्हाईस ऑफ मीडिया कळंब तालुका अध्यक्ष रणजित गवळी, उपाध्यक्ष रामराजे जगताप, प्रसिद्धीप्रमुख दीपक माळी, कोषाध्यक्ष सतीश तवले, कळंब तालुका कार्याध्यक्ष रामरतन कांबळे, राजेश पुरी, समाधान जाधव, अशोक कुलकर्णी, डिजिटल मीडिया कळंब तालुका अध्यक्ष अमोल रणदिवे व इतर व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.