कळंब (प्रतिनिधी) -येथे दत्त जयंती निमित्त  दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्र कळंब येथे सात दिवस चालणाऱ्या सप्ताहाची सांगता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या महाआरतीने करण्यात आली तसेच उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी मांदियाळी महाप्रसादाचे आयोजन याच देवी रोड वरील केंद्रात च्या ठिकाणी केलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी संजयजी होळे यांनी केले. 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषणात कळंब शहरात दत्त जयंती मोठ्या हर्षवल्लासात साजरी करण्यात आली.  अखिल भारतीय श्री स्वामी सेवा केंद्र त्र्यंबकेश्वर नासिक व कळंब शहरातील देवी रोड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त जयंती निमित्त सात दिवस सप्ताहाचे  सात दिवस सप्ताह आयोजन करण्यात आले होते आले होते या सात दिवसात गणेश याग, चंडीयाग रुद्र याग, स्वामी याग, मनोबल याग, अशा विविध प्रकारच्या होम हवन या यागाने प्रत्येक दिवशी विविध पारंपारिक पोशाखाने व वेशभूषांनी सर्व सप्ताह संपन्न झाला. यात शेकडो भाविक भक्तांनी लाभ घेतला. या सप्ताहासाठी खास नाशिक त्रिंबकेश्वर येथील बालाजी शास्त्री यांनी सात दिवस महापूजेचे आयोजन केले व   तसेच यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्र चे जिल्हा प्रतिनिधी श्री संजयजी होळे तसेच त्यांच्या सौभाग्यवती सुप्रियाताई होळे याच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला त्याचबरोबर त्यांच्यासोबत श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी प्रतिभाताई भवर, मिनाक्षी बियाणी, रेखा सोमाणी, मनिषा यादव, साई शिंपले, ललिता कसबे, मंदा शिंदे, मकरंद शेटे, तन्मय जाधव, आदी सेवेकरांनी परिश्रम घेतले.


 
Top