तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील धनेगावमध्ये सातत्याने विविध कारणाने ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, गावाचा नाल्या स्वछता न केल्याने बुजल्याने गावात सर्वञ सांडपाणी रस्त्यावर येवुन वाहत आहे. गावाकडे येणारे रस्ते उखडल्याने ग्रामस्थ या रस्तांना वैतागुन गेले आहेत. येथील ग्रामस्थांना मुलभुत सुविधा ही मिळत नसल्यामुळे प्रशासनानेे या गावाकडे लक्ष देवुन गावात पाणी, स्वच्छता. चांगले रस्ते बाबतीत उपाययोजना करण्याची मागणी ञस्त गामस्थांमधुन केली जात आहे.
तालुक्यातील धनेगाव हे अवघ्यासाडेचारशे लोकवस्तीचे गाव असुन या गावातील ग्रामस्थांनी गाव पुर्नवसनासाठी गेलीअनेक वर्षापासून निवडणुकांन वर बहिष्कार टाकल्याने या गावाला सरपंच नसल्याने या गावचा कारभार मागील दहा वर्षापासुन एकच ग्रामसेवक पहात आहे. हा ग्रामसेवक या गावात वास्तव्य करीत नसुन या गावाचा पाचवीला अस्वछता, पाणीटंचाई, उखडलेले रस्ते पुजले असल्याने ग्रामस्थांना मुलभुत सुविधा ही मिळत नसल्याने यागावच्या ग्रामस्थांचे जिणे निर्वासिता सारखे बनले आहे. येथे ग्रामसेवक याच पदावर गेली दहा वर्षापासून ठाणमांडुन बसला आहे. आपले कुणीही काहि करीत नसल्याच्या अर्विभात हा ग्रामसेवक वागत असल्याने येथील ग्रामस्थांना गेली अनेक वर्षा पासुन मुलभुत समस्या पासुन वंचित राहावे लागत आहे. सध्या ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थ तुळजापूर हुन पाणीटँकर मागवुन आपलीतहान भागवत आहेत. ग्रामस्थांना सोयीसुविधा साठी विविध येणाऱ्या वित्त आयोगातील निधी जातो कुठे याची चौकशी करुन दोषी अंती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

