धाराशिव (प्रतिनिधी) - नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात येऊन सरसकट कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी. तसेच शासकीय विभागात कोणत्याही स्वरूपाच्या खाजगीकरण, कंत्राटीकरणास सक्त मज्जा करण्यात यावा यासह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मागण्या मान्य करण्याच्या मागण्यासाठी दि.14 डिसेंबर रोजी बेमुदत संप आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत. तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार संपकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

तसेच यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक चंद्रकांत शिंदे, कार्याध्यक्ष यशवंत डोलारे, उपाध्यक्ष ए.एफ. शेख, सरचिटणीस बालाजी पांचाळ, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एस.बी. तांबोळी, नर्सेस असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपाल वाघमारे, महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जी.एस. बेद्रे, जिल्हा सचिव डी.जी. लग्गड, पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेचे सरचिटणीस संजयकुमार माळी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक म्हेत्रे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संघटनेचे अध्यक्ष ए.एस. पवार, वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे किशोर माने, मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष जयपाल शेरखाने, वर्ग कर्मचारी संघटनेचे जावेद शेख यांच्यासह महिला, पुरुष अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top