भूम (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पेन्शन रद्द करुन जुनी पेन्शन लागु करावी यासाठी तहसिल कार्यालय कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी संघटना, पंचायत समिती कर्मचारी यानी दि. 14 डिसेंबर पासून कामबंद आंदोलन सुरु केला आहे. या संपात महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न असल्याने तालुक्यातील सर्व कर्मचारी दि. 14 डिसेंबर पासून राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत. 

यावेळी तहसिल कार्यालयात परिसरात कर्मचारी संपात सहभागी असलेले दिसून आले. यावेळी तलाठी संघटना अध्यक्ष एस. पी. ढोंणे, महसुल कर्मचारी संघटना एच. ए. पवार, ए. के. कांबळे, आर. के. मशायक, एल. व्ही. भाग्यवंत, एम. बी. गुरव, के. आर. शित्रे, आर. एस. जिकरे, एस. एम. क-हाळे, एस. ई. सुकाळे, के. आर. कुलकर्णी, तलाठी देडे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.


 
Top