भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास असलेली ईट ग्रामपंचायत अविश्वास ठरावाच्या नाट्यानंतर एका वेगळ्याच कारणाने पुन्हा चर्चेत आली आहे. कचरा उलचण्याच्या गाडीस ड्रायव्हर न मिळाल्यामुळे शेवटी सरपंचांनी हातात कचराच्या गाडीचे स्टेरिंग घेतले आहे. 

काही दिवसांपूर्वी सरपंच संजय आसलकर यांच्या विरोधात 13 ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच मनमानी कारभार करत असल्याचे म्हणत अविश्वास ठराव मांडला होता. तहसीलदार यांनी अविश्वास ठरावा करिता ज्यावेळी बैठक बोलावली त्यावेळी ते 13 सदस्य बैठकीस गैरहजर राहिले. संजय आसलकर पुन्हा सरपंच म्हणून निवडले गेले. पुन्हा एकदा गावकऱ्यांना त्याची चांगलीच प्रचिती आली. गेल्या काही दिवसांपासून गावात ग्रामपंचायतकडे कचरा गोळा करण्यासाठी असणाऱ्या घंटागाडीवर चालक नसल्याची बाब सरपंच आसलकर व ग्रा.पं.सदस्य सयाजी हुंबे यांच्या लक्षात होती. त्यांनी वाहन चालवण्याकरिता अनेक वाहन चालकांसोबत संवाद साधला पण गाडीवर वाहन चालक म्हणून काम करण्यास कोणीही तयार होत नव्हते. शेवटी सरपंच संजय आसलकर यांनी गाडीचे स्टेरिंग हाती घेत गेल्या 3 ते 4 दिवसापासून गावातील कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. 


 
Top