भूम (प्रतिनिधी)-नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला तीन राज्यात घवघवीत यश मिळाले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्येही संपूर्ण देशात 300 पेक्षा अधिक जागा निश्चितपणे मिळतील. फक्त सुपर वॉरियर्स यांनी पक्षाच्या धोरणानुसार सक्रिय राहावे, असे आवाहन भाजपचे भूम,परंडा, वाशी विधानसभेचे विस्तारक प्रमुख शिवाजी गिड्डे यांनी बैठकीत बोलताना केले.
शासकीय विश्रामगृह येथे भारतीय जनता पार्टीच्या मोजक्या आणि प्रमुख सुपर वॉरियर्सची बैठक भूम, परंडा, वाशी विधानसभा विस्तारक प्रमुख शिवाजी गिड्डे यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली.या बैठकी दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारंभिक स्वरूपात भूम शहरातील 16 वार्डसाठी सहा सुपर वॉरियर्स नेमणूक केली. शासनाच्या योजनांची माहिती द्यावी असे आवाहन करून प्रत्येक सुपरवायर्सच्या कामाची दखल देखील पक्ष पातळीवर घेतली जाणारा असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रित सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, संतोष सुपेकर, बाबासाहेब वीर, शंकर खामकर, हेमंत देशमुख, प्रदीप साठे, सचिन बारगजे, संतोष अवताडे, लक्ष्मण भोरे, शांतीलाल बोराडे आदींची उपस्थिती होती.