नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर  हिरेमठाचे निर्विकल्प समाधिस्त राजगुरू श्री ष.ब्र.108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य म्हास्वामीजी यांचा पुण्यस्मरण सोहळा दि.5 डिसेंबर रोजी शिवलिंगेश्वर हिरेमठात मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधिपती श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराजांच्या संकल्पनेतुन मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन या पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, माजी सैनिक, डॉक्टर, सेवानिवृत्त शिक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा म्हास्वामीजींच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.

सालाबादाप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधिस्त राजगुरू श्री ष.ब्र.शिवलिंगेश्वर शिवाचार्य म्हास्वामीजी यांचा पुण्यस्मरण सोहळा दि. 4 व 5 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री म.नी. प्र.शिवबसव म्हास्वामीजी विरक्तमठ खेडगी हे होते. दिव्य सानिध्य श्री म.नी. प्र.राजशेखर म्हास्वामीजी विरक्त मठ नंदगाव तर सानिध्य श्री म.नी. प्र.श्री शांतलिंगेश्वर म्हास्वामीजी हे होते तर नेतृत्व श्री ष.ब्र.शिवयोगी शिवाचार्य निलकंटेश्वर मठ अणदुर,श्री म.नी. प्र. शंकरराजेंद्र म्हास्वामीजी,म.नी. प्र.श्री मुरघेन्द्र म्हास्वामीजी,श्री ष.ब्र.मल्लिकार्जुन शिवाचार्य,श्री ष.ब्र.सुत्तरेश्वर शिवाचार्य,श्री .ष.ब्र.शिवानंद शिवाचार्य,श्री म.नी. प्र.बसवलिंग म्हास्वामीजी,म.नी. प्र.विरंतेश्वर म्हास्वामीजी,श्री पुज्य प्रभु देवरू हे उपस्थित होते. प्रारंभी श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधिपती श्री .ष.ब्र.बसवराज शिवाचार्य महाराजांनी सर्व म्हास्वामीजींचा सत्कार केला. सकाळी सहा वाजता महारुद्राभिषेक व दीक्षा अय्याचार हा कार्यक्रम झाला. त्यानंतर सकाळी 10 वा. राजगुरू श्री शिवलिंगेश्वर शिवाचार्य म्हास्वामीजी यांचा पुण्यस्मरणोत्सव व धर्मसभा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा म्हास्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर म्हस्वामीजींनी मार्गदर्शन केले. शेवटी महाप्रसाद झाल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमास श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे शिष्य, भक्तगण व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top