सोलापूर (प्रतिनिधी)-श्रीमती चित्रा यादव, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला विकास संस्था यांनी संचालित आणि व्यवस्थापित केलेल्या महिला विकास संस्थाना दि. 21.12.2023 रोजी भेट दिली. यामध्ये, रेल्वेत काम करणाऱ्या महिलांना मदत करण्यासाठी बाधवर पार्क येथे शिवणकाम केंद्र, बुटीक व ब्युटी पार्लर  संस्थाचा समावेश आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णालयामध्ये चालवण्यात येणाऱ्या संतुष्टी उपहार गृह (कॅन्टीन), चुनमुन क्रेचे आणि इस्त्रीवाला संस्थानाही महिला अध्यक्षा श्रीमती यादव यांनी भेट दिली.

श्रीमती यादव यांनी मध्य रेल्वे महिला विकास संस्था द्वारे चालवल्या जाणाऱ्या केंद्रांच्या कर्मचाऱ्यांना आणि निर्मल पार्क आणि बधवार पार्क रेल्वे निवासी वसाहतींच्या आऊटहाऊसमध्ये राहणाऱ्या महिलांना पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना चांगली वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याबाबत योग्य ते समुपदेशन केले.

या पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण रेल्वे महिला विकास केंद्रीय संस्था, रेल्वे बोर्डाने महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यासाठी सुरू केलेल्या “दस्तक”या उपक्रमाचा एक भाग आहे. या भेटीदरम्यान श्रीमती नीतू अरोरा - सरचिटणीस, श्रीमती प्रिती श्रीवास्तव - कोषाध्यक्ष आणि मध्य रेल्वे महिला विकास संस्थाचे इतर सदस्यही उपस्थित होते.


 
Top