धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय रेल्वेने, एलस्टम कंपनीच्या सहकार्याने डब्लूएजी 12बी इलेक्ट्रिक इंजिन यशस्वीरित्या विकसित आणि वापरात आणले आहे, हे भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन आहे, जे देशाच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे देशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे.  

मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड या नावाखाली  आणि भारतीय रेल्वे  यांच्यातील संयुक्त उपक्रमाने 800 पूर्णपणे इलेक्ट्रिक, उच्च-शक्तीचे, दुहेरी-विभागीय इंजिन तयार करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हे इंजिन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतूक नेटवर्कमध्ये योगदान देत समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरसह अवजड मालवाहू गाड्यांची जलद आणि चलन सुरक्षित व सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. 

डब्लूएजी 12बी इलेक्ट्रिक इंजिनची प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्ये:  

कर्षण अश्वशक्ती: 12,000 एचपी (9 एमडब्लू), कमाल वेग: 120 किमी प्रतितास, एक्सल लोड: 22.5/25 टन, वाहण्याची क्षमता: 1/150 उतारावर 60 किमी प्रतितास वेगाने 6,000 टन/6,300 टन, एकूण कर्षण: 706/785 केएन, सततचे कर्षण: 540 केएन, अतिरिक्त पुनरुत्पादन: 514 केएन, गिअरबॉक्ससह ट्रॅक्शन एकूण कार्यक्षमता: 89%

बिहारमधील विस्तीर्ण मधेपुरा या ठिकाणी उत्पादित असलेले डब्लूएजी 12बी ई-लोको स्वदेशी उच्च अश्वशक्तीचे इंजिन बनवणाऱ्या ‌‘लीग ऑफ नेशन्स' (राष्ट्रसंघात जगात सहाव्या स्थानावर) भारताचे प्रतिनिधित्व करते. मधेपुरा येथे एकूण 250 एकरमध्ये पसरलेली जागा आहे व 85% पेक्षा जास्त स्वदेशीकरण साध्य करून वार्षिक 120 इंजिनच्या उत्पादन क्षमतेसह आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांवर कार्य तेथे करता येते. 

ई-लोकोची ठळक वैशिष्ट्ये-

पँटो नियंत्रण, ब्रेक ब्लेंडिंग कंट्रोल, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर नियंत्रण, वॉल्व्ह नियंत्रण, प्रसारित करण्याची यंत्रणा, मशीन भागातील तापमान निरीक्षण, बाह्य संरचना आधारित बांधणी, आपत्कालीन ब्रेक नियंत्रण आणि आपत्कालीन स्थितीत पूर्णपणे थांबणे, वेग नियंत्रण परवानगी, टीई/बीई मर्यादा नियंत्रण, स्पीड फ्रीझ (मेमरी), डब्बे निसटण्याचे नियंत्रण, सर्व सहाय्यक ब्लोअर नियंत्रण, वीसीडी नियंत्रण नियंत्रीत बॅटरी चार्जर, एचवीएसी ड्राइव्ह आणि ब्रेक नियंत्रण, कूलन यंत्रणा.

पुनरुत्पादीत गति नियंत्रण ब्रेकिंग. व्हील स्लिप आणि स्लाइड कंट्रोल. मास्टर कंट्रोलर अयशस्वी झाल्यास ड्राइव्हर डिसप्ले यूनिटद्वारे सॉफ्ट ड्रायव्हिंग मोड उपलब्ध, ड्राइव्हर डिसप्ले यूनिट वर पेंटो, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर, कंप्रेसर, इब्लॉक, सँडिंग इत्यादीसाठी सॉफ्ट कंट्रोल उपलब्ध, ड्राइव्हर डिसप्ले यूनिट द्वारे इंजिन बंद करण्याची सोय.

आग नियंत्रण सुविधा,दोष निदान, हेल्थ हबचे प्रत्यक्ष माहितीद्वारे विश्लेषण. अनावश्यक ट्रॅक सर्किट मॉनिटरिंग आणि ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम. दोन युनिट्स (ए आणि बी) कायमस्वरूपी एकमेकांशी जोडलेले आहेत आणि दोन्ही युनिट्समध्ये फक्त बाह्य टोकांवर कॅब आहेत. 

 दोन्ही युनिट्सचे कार्यरत कॅबमधून नियंत्रण. दोन पँटोग्राफ प्रदान आणि ज्यामध्ये फक्त एकामार्फत पॉवर फीड. युनिट्स व्हेस्टिब्युल आणि गँगवेद्वारे एकमेकांशी संलग्न.

एमसीबी, पीटी, सीटी, एसए सारखी सर्व एचवी उपकरणे मशीन रूममध्ये ठेवली आहेत.पर्यावरणपूरक रेल्वे महाजालाच्या दिशेने पुढाकार घेत मध्य रेल्वेने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे.

प्रकल्पातील प्रमुख सुविधा

- सहारनपूर डेपो: सहारनपूर डेपो हा एक अत्याधुनिक देखभाल सुविधेचा डेपो आहे जो गाडी बंद पडण्याचा अंदाज घेण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, यामुळे भारतातील सर्वात प्रगत मालवाहतूक इंजिनची सक्रिय देखभाल करणे शक्य होते. या डेपोमध्ये इंजिन अंतर्गत प्रशिक्षण केंद्र आणि रेल्वे कर्मचारी आणि इंजिन चालक यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी अत्याधुनिक वर्ग आहेत.

- मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर: हा अत्याधुनिक पर्यावरणपूरक कारखाना जागतिक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शक्तिशाली इंजिनची निर्मिती करतो. 17.6 एकर जमिनीवर पसरलेली ही सुविधा डब्लूएजी 12 ची देखभाल क्षमता वाढवते. तसेच   आणि भारतीय रेल्वे यांच्यातील सहयोगी भागीदारी दर्शवते. 

शासकीय डेपो नागपूर, मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड () चा एक भाग असून 'मेक इन इंडिया' उपक्रमाच्या महत्त्वपूर्ण पैलूचे प्रतिनिधित्व करतो. हे डेपो चार वर्षांच्या कालावधीत 251 ते 500 ई-इंजिन्सच्या ताफ्याच्या देखरेखीचे कार्य करते. यामध्ये  द्वारे तांत्रिक पर्यवेक्षण आणि भारतीय रेल्वेचे देखभाल/सहायक कर्मचारी पुरवले जातात.  

नागपूर मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड सरकारी देखभाल डेपो, भारतीय रेल्वे पायाभूत  सुविधांचा एक महत्त्वाचा घटक असून सार्वजनिक व खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल तत्त्वावरील इंजिन देखभालीसाठी ग्राहक-केंद्रित आणि बेंचमार्क साइटचे एक अग्रगण्य उदाहरण करण्याचे उद्दिष्ट आहे. सुरक्षा, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेची सर्वोच्च मानांकन कायम ठेवताना चालन चपळता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून डेपोचे उद्दिष्ट, टीमवर्कची संस्कृती, नैतिक आचरण व आपापल्या कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर ओळख निर्माण करणे. 

याव्यतिरिक्त, या डेपोमध्ये 17.6-एकर जमीन, 10,800 चौरस मीटर डेपो, 1,777 चौरस मीटरचे गोदाम, 3.29 किलोमीटरचा ट्रॅक आणि 3.5-किलोमीटर 25केवी वीज पुरवठा यासह प्रगत पायाभूत सुविधा असून सुविधेच्या औद्योगिक श्रेणींमध्ये उच्च-तंत्र औद्योगिक उपकरणांनी सुसज्ज असे 12 ट्रॅक समाविष्ट आहेत. तसेच ते 3,000 भागांची अद्वितीय अशी पुरवठा साखळी व्यवस्थापित करते. सरतेशेवटी भारताच्या 'मेक इन इंडिया' व्हिजनमध्ये महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरविताना डेपो नाविन्यपूर्ण, किफायतशीर आणि शाश्वत देखभाल उपाय प्रदान करण्याचा प्रयत्न रेल्वेद्वारे केला जातो. 

नागपूर आगारात सध्या 126 डब्लूएजी 12बी इंजिन्सची देखभाल केली जात आहे. डब्लूएजी 12बी इलेक्ट्रिक इंजिनचे तांत्रिक क्षमता त्यांच्या प्रगत वैशिष्ट्यांद्वारे स्पष्ट होते. तसेच यामध्ये एक मजबूत बोगी डिझाइन, ट्रॅक्शन कार्यक्षमता व ड्रायव्हर-केंद्रित कॅब कार्यक्षमतेचा समावेश आहे आणि यामुळे चालन कार्यक्षमता व सुरक्षिततेमध्ये मोठे योगदान होते. सुरक्षितता, विश्वासार्हता आणि परिचालन उत्कृष्टतेला प्राधान्य देत ग्राहक-केंद्रित, नाविन्यपूर्ण व शाश्वत देखभाल उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वे हे उपक्रम राबवते.


 
Top