तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी रविवार दि. 31 डिसेंबर रोजी तिर्थक्षेञी तुळजापूरला येवुन सहकुटुंब देवि मातेचे दर्शन घेऊन महाराष्ट्रातील जनतेला व शेतक-यांना सुखी ठेव असे साकडे घातले.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, सोलापूर जिल्हाप्रमुख मनिष आण्णा काळजे, पंढरपूरचे जिल्हाप्रमुख चरणदास चौरे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, समन्वयक समिती मुंबईचे बापुसाहेब अडसुळसर, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे, संकेत पाटील, उपतालुका प्रमुख खंडू कुंभार, शहरप्रमुख बापू भोसले, युवासेनेचे अभिजीत पाटील, भाजपचे विशाल रोचकरी, श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे, मनोज मिश्रा, मोहन भोसले आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर महासंघाचे गोगावलेना निवेदन
तिर्थक्षेञ पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सोन्या-चांदीच्या वस्तू, मौल्यवान दागिने आदींच्या ताळेबंदामध्ये नोंदी नसणे, प्रसाद बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे तेल वापरणे आदींची एसआयटीद्वारे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी किशोर गंगणे यांनी शिवसेना शिंदे गट विधानसभा गटनेते भरत गोगावले यांना दिले. यावेळी भोपेपुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, शिवसेना शिंदे गट शहरप्रमुख बापुसाहेब भोसले सह अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते.