तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील समता नागरी सहकारी पंतसंस्थेच्या चेअरमनपदी भाजप शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांची तर व्हा. चेअरमनपदी नगरसेवक अभिजीत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या  पंचवार्षिक पदासाठी  चेअरमन व्हा चेअरमन पदाचा निवडीसाठी शनिवार दि 30रोजी  बैठक ए. आर. ऑफिसचे प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. यात चेअरमनपदी  प्रशांत (शांताराम) रामचंद्र पेंदे यांची तर व्हा. चेअरमनपदी अभिजित

धनंजय कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक अविनाश धट, श्रीकांत वादे, रविंद्र  इंगळे, श्रीकांत कदम, दिपक निकम, वीर, कालिदास भोसले, एन डी. शिंदे, सावळे इत्यादी सह सदस्य उपस्थित होते. नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


 
Top