वाशी (प्रतिनिधी)- येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाचे प्राध्यापक महादेव उंद्रे यांची कन्या  कु. अमृता महादेव उंदरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी 2022 मध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये उपनिबंधक/ दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरिक्षक आणि विक्रीकर निरीक्षक या दोन्ही पदावर दुहेरी यश संपादन केले आहे. उपनिबंधक या पदासाठी राज्यातून मुलींमधून व्दितिय क्रमांक तर विक्रीकर निरीक्षक या पदासाठी चौथ्या क्रमांकाने यश संपादन केले आहे.     

कु. अमृता हिचे प्राथमिक शिक्षण वाशी येथे माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे व उच्य माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे झाले असून अभियांत्रिकीची पदवी श्री.गुरुगोविंदसिंह अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड येथून घेतले आहे. तीने मिळवलेल्या विशेष यशामुळे तिचे वाशी येथील शिवसेना नेते प्रशांत चेडे तसेच वाशी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे व राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर वाशी येथील ग्रामस्थ, व्यापारी वर्ग, नातेवाईक मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.


 
Top