तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील धाराशिव रोडवरील मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्यील विद्यार्थी व शिक्षकांनी अध्यक्ष दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथील सयाजीराजे पार्क या ठिकाणी भेट दिली. दप्तराविना शाळा या अंतर्गत शनिवार रोजी मुक्तांगण इंग्लिश स्कूल मधील इयत्ता  ते सहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल सयाजीराजे पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोहणे ,विविध प्रकारचे खेळणे, धावणे याबरोबरच वनभोजन याचा आस्वाद देण्यात आला. या पर्यटनसहलीचा विद्यार्थ्यांनी मनमुरांदपणे आनंद लुटला. मुख्याध्यापिका यांच्यासह इतर सहा शिक्षकांचा या सहलीत समावेश होता. 


 
Top