भूम (प्रतिनिधी)- शहरातून आलमप्रभू देवस्थानकडे जाणारा रोडची दुरावस्था झाली असून यात्रेपुर्वी रोडची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत नगर पालिकेने या रोडच काम केले आहे. देवस्थान जवळील चढावरील रोडवर खड्डे पडले आहेत. बारीक चुरा उतारावर आल्याने देवस्थानकडे जाताना व येताना दुचाकी वाहन स्लिप होवुन अपघाताची संख्या वाढली आहे. निदान यात्रेपुर्वी याची दुरुस्ती करावी अशी मागणी भाविक करत आहेत.

तसेत याच रोड गालिब नगरकडे वळताना सटवाई मंदिराजवळील डांबरी रोड उखडला असून मोठे मोठे खड्डे पडल्याने या परिसरात वेगात आलेल्या वाहनास अंदाज न आल्याने सातत्याने या ठिकाणी अपघात होत आहेत. काही दिवसावर यात्रा आल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता या रोडची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांनकडून होत आहे.


खड्डे बुजविण्याचे काम सुरू

दरम्यान शहरातील परंडा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे बुजविण्याचे काम दि 26 डिसेंबर पासून सुरु झाले. हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. या रोडसाठी गोलाई चौक ते आरसोली रोड पर्यंत नव्याने निधी मंजूर झाला असून हा संपुर्ण सिमेंन्ट रोड होणार आहे. या रोडचे नव्याने काम सुरु होणार असताना गावाची जत्रा याचे कारण पुढे करत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम करताना पडलेल्या खड्यातली माती न काढता वरुन डांबर टाकून त्यावर कचखडी टाकून थातुर मातुर काम करण्यात येत आहे. हे काम करत असताना या रोडवरील काही खड्डे बुजवले जात असून काही तसेच सोडून दिले आहेत. यास व्यवस्थीत दबाई न केल्याने काही तासातच रस्ता आहे का खड्यात रस्ता आहे दिसून येते. या रोडवर अनेकदा खड्डे पडले की मलमपट्टी करुन बोगस बिले उचलण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असल्याच्या प्रतिक्रिया नांगरिकांनमधून व्यक्त होत आहे. काही महिन्यात नविन सिमेन्ट रस्ता काम सुरु होणार असल्याने आज खड्डे बुजवून नुसते बिल उचलण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल नागरिकांनमधून व्यव्त होत आहे. 
Top