तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथे संविधान दिनानिमित्त स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष कानिफनाथ देवकुळे यांच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
कानिफनाथ देवकुळे यांच्या वतीने “जातीव्यवस्थेचे निर्मुलन“ व“ भारतीय संविधान “ या पुस्तकाच्या प्रतिचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच दिदी काळे, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे, नवनाथ पसारे, जुनेद मोमीन, जोशीला लोमटे,सोमनाथ फासे, बाबुराव नाईकवाडी,लखन रसाळ,खालेद काझी,शशिकांत सोनवणे, संभाजी कांबळे, लाला शिंदे, संदिप गालटे,राजाभाऊ थोडसरे,सचिन कांबळे, तानाजी पिंपळे, अविनाश आगाशे दत्ता कांबळे, अमोल कसबे, सचिन देवकते, बापू नाईकवाडी, इर्शाद मुलांनी, बिभीषण लोमटे,धनाजी आंधळे,अजय कांबळे, नारायण साळुंके आदी उपस्थित होते.