धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील सांजा येथील भूमीपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै बाबासाहेब सुर्यवंशी नाव देण्यात आले आहे. सांजा रोडला स्वातंत्र्य सैनिक कै बुबासाहेब सुर्यवंशी असे नामकरण दि.23 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

धाराशिव शहरातून सांजा गावाला जाणाऱ्या रोडला आजपर्यंत सांजा रोड या नावाने ओळखले जात होते. मात्र यापुढे या रोडला स्वातंत्र्यसैनिक कै बुबासाहेब सुर्यवंशी या नावाने ओळखले जाणार आहे.  स्वातंत्र्य सैनिक सुर्यवंशी यांनी यांनी हैदराबाद व गोवा मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये लढा दिला होता. या रस्त्याला सुर्यवंशी यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला असून त्याचे उद्घाटन हनुमंतप्पा सुर्यवंशी यांच्या हस्ते हस्ते करण्यात आले आहे. यावेळी गफूर शेख, शिवनेरी रिक्षा स्टॉपचे सदस्य उपस्थित होते.


 
Top