तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील पिंपळा (बु) व गोंधळवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बांधण्यात आलेल्या वर्ग खोल्यांचे उदघाटन बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी राम रेडडी व बालाजी अमाईन्सचे पुर्णवेळ संचालक एन राजेश्वर रेड्डी यांच्या हस्ते दि 23.08.2023 रोजी करण्यात आले. पिंपळा (बु) येथिल शाळेत जुन्या पध्दतीचेवर्ग होते. त्यावर्गात 20 मुलांना बसण्याकरीता जागा उपलब्ध होती. एवढे लहान वर्ग होते. गावातील नागरीक, पालक व शाळेचे शिक्षक यांनी बालाजी अमाईन्स च्या संचालक मंडळाकडे नविन दोन वर्ग बांधकाम करून मिळणे बाबत मागणी केली होती. त्यांच्या मागणी नुसार बालाजी अमाईन्सच्या वतीने दोन वर्ग खोल्या बांधकाम करण्यास संचालक मंडळाकडून मान्यता देण्यात आली.

बालाजी अमाईन्स च्या वतीने सी. एस. आर अंर्तगत पिंपळा (बु) येथे जिल्हा परिषद शाळेत दोनवर्ग असलेली सुंदर इमारत बांधकाम करून तयार केली. त्या दोन वर्गाचे उदघाटन आज बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी राम रेड्डी व बालाजी अमाईन्सचे पुर्णवेळ संचालक श्री. एन राजेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री देवीदास गायकवाड यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे शाळेकरीता सुंदर वास्तू बांधकाम करून दिल्याबददल आभार मानले. या प्रसंगी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेडडी यांनी पिंपळा (बु) गावातील युवक व पदाधिकरी तसेच शाळेतील विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावातील तसेच शाळेतील परिसरात वृक्षारोपण करण्यास कंपनीच्यावतीने झाडांची रोपे देणार असल्याचे सांगितले. तसेच कंपनी च्या विविध उत्पादनाची माहीती तसेच बालाजी अमाईन्सच्या उत्पादनाचा विविध औषध कंपन्याकरीता वापर या संबंधी माहीती विदयार्थी वर्गास करून दिली. या कार्यक्रमास बालाजी अमाईन्स चे सीएसआर विभाग प्रमुख मल्लिनाथ बिराजदार, मुख्याध्यापक देविदास गायकवाड, नेताजी डांगे, गिरी राऊत, कादम, शालेय समिती अध्यक्ष विलास धनके, राधिका धनके, महादेव पंडागळे, शाळेतील सर्व शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.

जिल्हापरिषद प्राथमिक शाळा गोधळवाडी येथे बालाजी अमाई न्सच्यावतीने एक वर्ग खोली बांधण्यात आली आहे त्या वर्ग खोली चे उदघाटन आज बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री डी राम रेडडी व बालाजी अमाईन्सचे पुर्णवेळ संचालक श्री. एन राजेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुरतगाव केंन्द्रप्रमुख श्री टी. एस. क्षीरसागर सर यांनी बालजी अमाईन्सच्या मदती मुळे पिंपळा बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकरीता 2 वर्ग खोल्या, गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकरीता 1 वर्ग खोली, तसेच पिंपळा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकरीता एक वर्ग खोली, बांधकाम करून शाळांना होणारी खुप मोठी मदत केली या बददल बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेडडी व सह व्यवस्थापकीय संचालक एन राजेशवर रेडडी तसेच संचालक मंडळ यांचे आभार मानले. गोंधळवाडीगावातील ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच संदिपान मोटे, गुलाब मोटे, पोपट मोटे नामदेव सातपुते, शिक्षक तोटावाड, मगर एल. एम, मुख्याध्यापक पिंपळे. पी.एच., बटणे मॅडम, भुसे मॅडम, तसेच बालाजी अमाईन्स चे सी एस आर विभागप्रमुख एम ए बिराजदार तसेच बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, पालकवर्ग तसेच नागरिक उपस्थित होते.


 
Top