तुळजापूर (प्रतिनिधी)- स्ञीशक्ती देवता श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर  तालुक्यातील मसला  (खुर्द) येथील बाबू मामा गायकवाड यांची लेक सौ.स्नेहा विनोद कांबळे हिने जत येथे नुकत्याच संपन्न झालेल्या“खंडोबा केसरी किताब” स्पर्धचे विजेतेपद पटकावुन  मानाचा  चांदीची गदा 76 किलो महिला खुल्या कुस्ती गटात पटकावली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्यावतीने त्यांना फेटा बांधुन गावच्या लेकीचा सन्मान केला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सहकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 
Top