तुळजापूर (प्रतिनिधी)- माजीमंञी आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रिमियर 2023 पर्व पहिलेचे विजेतेपद आरसीसी अँकडमी बार्शीला मिळाले. दीड लाख रूपये रोख व चषक देण्यात आला. तर उपविजेता पदावर अमोल कुतवळ अँकडमीला एक लाख रूपये रोख व चषक देण्यात आला.
अंतिम सामना शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी पार पडला. यात हाडको मैदानावर फटाक्यांच्या प्रचंड आतीषबाजीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघास बक्षिसे देण्यात आले. धाराशिव लोकसभा मतदार संघ निमंत्रीत नाईट सामन्यात जिल्हयातील सोळा संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धतील प्रथम विजेत्या संघास प्रथम पारितोषिक दीड लाख रुपये व चषक, युवानेते विनोद गंगणे यांच्या वतीने आरसीसी कल्ब बार्शीला देण्यात आले. उपविजेत्या संघास एक लाख रुपये व चषक अमोल कुतवळ अँकडमी संघास कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील तर्फ देण्यात आले. तृतीय स्थानी एन. डी. बाँईज ॲकाडमी, चतुर्थ स्थानी बजरंग अँकाडमीस मिळाले. विजेत्या संघांना चषक रोख रक्कम देवुन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच तुकाराम कुंचे, मॅन ऑफ द सिरीज सौरभ बिराजदार यांना मिळाले. तर बेस्ट बँटसमन ओंकार कुलकर्णी एन.डी. बाँईज, बेस्ट बाँलर निलेश पाटील आरसीसी बार्शी हे ठरले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवानेते विनोद गंगणे, जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, पंडीत जगदाळे, विशाल रोचकरी, औदुंबर कदम, मिना कदम, किशोर साठे उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे मिञमंडळाचे कृष्णा गवळी, मुन्ना शिंदे, शैलेश गायकवाड, सौरभ बिराजदार, गणेश काळे, सौरभ छत्रे, नागेश, सुतार प्रतिक, जाधव किरण, धनके यांनी परिश्रम घेतले.
