धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील 7 पोलिस ठाण्यांतर्गत 2000 सालापासून अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल 891.119 किलो ग्रॅम जप्त गांजा न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार पोलिसांनी नष्ट केला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 2000 सालापासून जिल्ह्यातील 7 पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत 15 गुन्हे दाखल झाले होते. या 15 गुन्ह्यातील 891.119 किलो ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी लाखो रूपयांचा गांजा पोलिस मुख्यालय धाराशिव येथील कवायत मैदान येथे नष्ट करण्यात आला. 

यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक (गृह)  सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे,उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ काय्रालय लातुर संतोष कुमार चव्हाण, नायब तहसिलदार धाराशिव घृष्णेश्वर स्वामी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र धाराशिव अशोक पवार त्यांचे सहकारी सय्यद अशपाक,अग्नीशामक दल येथील संभाजी साळुंके, भारत जगन्नाथ म्हस्के (मंडळ अधिकारी), सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, सपोफौ काझी, पोलीस हावलदार औताडे, जावेद काझी, विनोद जानराव, पोलीस नाईक बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, शेख, पोलीस अमंलदार विठ्ठल गरड यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता करुन योग्य रित्या जाळून नाश करण्यात आला.


 
Top