परंडा (प्रतिनिधी) - एड्स या भयानक आजाराने ग्रस्त लोकांना समाजात लाजिरवाणीपणाचा सामना करावा लागतो या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक डिसेंबर या दिवशी जागतिक एड्स दिन साजरा केला जात आहे. या दिवशी लोकांना त्यांच्या प्रतिबंध आणि चाचणी बद्दल जागरूक केले जाते असे प्रतिपादन महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना केले.
येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तालुका विधी सेवा संघ परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव उपस्थित होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वकील सेवा संघ तालुका विधीज्ञ ॲड. अमोल पाटील. उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, शिवछत्रपती महाविद्यालय कळंब येथील प्रा. डॉ. शफीक चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी ॲड. अमोल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, शाळा, महाविद्यालय यांच्या माध्यमातून एड्स जनजागृती होत असल्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयामध्ये केले आहे .विद्यार्थ्यांनी आपापल्या स्तरावर समाजामध्ये एड्स जनजागृती केली पाहिजे. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. विद्याधर नलवडे, प्रा. डॉ. अक्षय घुमरे. प्रा.डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. अतुल हुंबे, प्रा. जगन्नाथ माळी, प्रा. विजय जाधव ग्रंथपाल,डॉ. राहुल देशमुख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी वसंत राऊत, भागवत दडमल, अरुण माने हनुमंत कुटे आदी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर गोरे पाटील, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे व विधी सेवा संघाचे ॲड. अमोल पाटील यांनी केले होते. शेवटी अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉ. सचिन चव्हाण यांनी मानले.