भूम (प्रतिनिधी)- सदा नंदेचा येळकोट येळकोट घे च्या जयघोषात तालुक्यातील वाकवड येथील श्री खंडोबा यात्रा उत्साहात संपन्नभूम शहरापासून अवघ्या 9 कि मी अंतरावर डोंगरघाटाच्या कुशीत आलेल्या वाकवड ता. भूम येथे चंपाषष्ठी (सट) दिवशी खंडोची यात्रा पुरातन कालापासून आजही टिकून आहे. नउ दिवस नवरात्र होवुन चंपाषष्ठी दिवशी यात्रा भरते. यानिमित्ताने ग्रामस्तांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. दि. 17 डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता झाली. रात्री  बार्शी येथील संगीत विशारद प्रसाद देशमुख, संगीत विशारद अंबादास देशपांडे, सुयोग केसकर  यांचा भावगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी विलासराव देशमुख, अरुण देशमुख, राम बोटे, श्रीपाद देशमु, संतोष देशमुख, प्रदिप देशमुख यांनी परिश्रम घेतले. पहाटे वेदशास्र संपन्न राजाभाउ धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत होम मुर्तीस महाअभिषेक, महाआरती, तळी उचलने श्री खंडोबाची वाजत गाजत पालखी आदी धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुर होते. ग्रामस्थांच्या वतीने तमाशाचे व कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. चंपाषष्ठी निमित्ताने दि. 18 डिसेंबरपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. भंडारा उधळने, नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. मंदिर परीसर पिवळ्या भंडाऱ्यांने न्हाहून निघाला होता. भूम, वाशी, पारगाव परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली.


 
Top