धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पसंख्याक तसेच मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणकि प्रवाहात आणण्यासाठी मार्टी, आर्टीसारख्या संस्थांची स्थापना सरकारने करावी. तसेच मुस्लिम समाजातील मागास जातींना पुन्हा आरक्षण बहाल करावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनातील औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक समाजातील मागासलेपण तसेच आर्थिक सामाजिक मागासलेपण दूर करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योतीसारख्या संस्थेची गरज आहे. समाजाकडून होत असलेल्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद संशोधन, प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात यावी.

तसेच पृथ्वीराज चव्हाण सरकारने त्यांच्या काळात मुस्लिम समाजातील 50 मागासलेल्या जातींना आरक्षण लागू केले होते. मात्र, पुढच्या सरकारने त्याचे रूपांतर कायद्यात न केल्याने ते टिकले नाही. हे आरक्षण पुन्हा बहाल करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. 

मातंग समाजातील समाजाकडून होत असलेल्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांसाठी आण्णाभाऊ साठे संशोधन, प्रशिक्षण संस्थेची आर्टी स्थापन करण्यात यावी. जेणेकरून या समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात येण्यास मोठा हातभार लागेल व त्यांना न्याय मिळेल, अशी मगाणीही आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनातील चर्चेदरम्यान व्यक्त केली आहे.


 
Top