तुळजापूर (प्रतिनिधी)-तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विदयालय येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने सीएसआर अंर्तगत बांधण्यात आलेल्या वर्ग खोल्यांचे उद्घाटन बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेडडी व बालाजी अमाईन्सचे पुर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी यांच्या हस्ते दि 13.08.2023 रोजी उद्घाटन करण्यात आले.
बालाजी अमाईन्सच्यावतीने सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे 2017 मध्ये दोन वर्ग खोल्या बांधण्यात आल्या होत्या. शाळेचा पट सध्या 950 असल्याने प्रत्येक इयत्तेच्या दोन दोन तुकडया असल्याने शाळेत विदयार्थाना दोन वर्गाची गरज होती. तामलवाडी गावातील पालक व संस्थेच्या पदाधिकारी मंडळानी नविन दोन वर्ग बांधकाम करून मिळावे अशी मागणी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाकडे केली होती. बालाजी अमाईन्सच्यावतीने पुर्वी बांधकाम केलेल्या दोन वर्गावर नविन दोन वर्ग बांधकाम करून एकूण चार वर्ग असलेली एक सुंदर इमारतीची शाळा बांधकाम करून दिले.
या प्रसंगी शाळेतील मुलींची संख्या जास्त असल्याने शाळेत एक सॅनेटरी इन्सीनेटर मशीन तसेच सॅनेटरी वेंडींग मशीन बसवण्यात येईल असे सांगितले. बालाजी अमाईन्सच्यावतीने तामलवाडी परिसरातील शाळा व शैक्षणिक मदत करण्यास बालाजी अमाईन्स सदैव तयार आहे हे ही त्यांनी सागितले. या प्रसंगी संस्थेचे बालाजी अमाईन्सचे पुर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेडडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष बसवण्णअप्पा मसुते यांनी बालजी अमाईन्सचे संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेडडी व एन. राजेश्वर रेड्डी यांचे दोन वर्ग खोल्या व तसेच अत्यंत सुंदर शाळेची इमारत बांधकाम करून दिल्याबददल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास बालाजी अमाईन्स सीएसआर विभागप्रमुख मल्लिनाथ बिराजदार, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुहास पडणे, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सचिव यशवंता लोढे, संचालक मल्लिनाथ मसुते, बाळासाहेब जगताप, अब्बास पटेल, गोरख माळी, माजी सरपंच दत्तात्रय वडणे, हमीद पठाण, ग्रामविकास अधिकारी चैत्यन गोरे, महादेव मसुते, खालजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, परिससतील नागरिक, पालक व विद्यार्थी, शाळेचे सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
