तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या दागदागिने घोटाळा व भष्ट्राचार प्रकरणाचा तपास उच्च पोलिस अधिकाऱ्यामार्फत तात्काळ करण्याची मागणी श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ माजी अध्यक्ष किशोर गंगणे व ॲड. शिरीष कुलकर्णी यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
श्रीतुळजाभवानी मातेच्या प्राचीन मौल्यवान दागदागिने गायब झाल्या प्रकरणी संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील प्रकरण पंतप्रधान कार्यालयापर्यत गेले आहे. तरी आपण स्वतः तत्पर राहुन याची उच्च पोलिस अधिकाऱ्यामार्फत म्हणजे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत करावी कारण हा विषय संवेदन शिल बनला आहे. अन्यथा आम्ही उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, वेळेप्रसंगी आमरण उपोषण करु असे म्हटले आहे.
